आता गुगल पेच्या माध्यमातून भेट द्या सोने

यूपीआय मनी ट्रांसफर अ‍ॅप गुगल पेवरून सोने खरेदी-विक्री करता येत होते. मात्र आता या अ‍ॅपवरून सोने गिफ्ट देखील करता येणार आहे. या अ‍ॅपच्या नवीन अपडेटमध्ये हे खास फीचर देण्यात आलेले आहे. काही दिवसांपुर्वीच गुगलने मेटल आणि मायनिंग सर्विस प्रोव्हाइडर MMTC-PAMP सोबत भागिदारी केली आहे. जेणेकरून युजर्स सोने खरेदी-विक्री करू शकतील.

गुगल पे V48.0.001_RC03 व्हर्जनमध्ये हे फीचर समोर आले आहे. हे फीचर अद्याप लाईव्ह करण्यात आलेले नाही व कधी रोल आउट केले जाईल, याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

गुगल पेने या वर्षी एप्रिलमध्ये गोल्ड वॉल्ट फीचर जोडले होते. जे युजर्सला सोने-खरेदी-विक्री करण्यास मदत करते. युजर्स या अ‍ॅपद्वारे 24 कॅरेट सोने युनिट खरेदी-विक्री करू शकतात. अ‍ॅपद्वारे खरेदी केलेले सोने MMTC-PAMP च्या एक्यूमूलेशन प्लांट (GAP) मध्ये स्टोर केले जाते. युजर्स या अ‍ॅपमध्ये सोन्याचे बदलते भाव देखील बघू शकतात.

Leave a Comment