पंकजा मुंडे यांच्या ट्विटरवरील ‘भाजप’ गायब


मुंबई : सध्या भारतीय जनता पक्षाचा माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ट्विटर हॅण्डलवर उल्लेख नसून पंकजा मुंडे यांनी ट्विटर हॅण्डलवरील बायोमधून भाजपच्या पदाचा उल्लेख हटवल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. त्याचबरोबर काल फेसबुकच्या माध्यमातून 12 डिसेंबर रोजी आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे काय सांगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंकजा मुंडेंचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात त्यांचा पराभव केला. सध्या कोणत्याही सभागृहाच्या पंकजा प्रतिनिधी नसल्यामुळे कदाचित त्यांनी भाजपचा उल्लेख काढला असावा असे म्हटले जात आहे.