परदेशी हॅकर्सच्या निशाण्यावर भारतीय नागरिकांचे एटीएम कार्ड, होऊ शकते खाते रिकामे - Majha Paper

परदेशी हॅकर्सच्या निशाण्यावर भारतीय नागरिकांचे एटीएम कार्ड, होऊ शकते खाते रिकामे

आजच्या काळात प्रत्येक जण एटीएम कार्डचा वापर करतो. यामुळे पैसे काढणे सोप तर होतेच, त्याचबरोबर वेळ देखील वाचतो. मात्र दुसरीकडे हॅकर्स या कार्डची माहिती चोरी करून फसवणूक करण्याची शक्यता असते. काही दिवसांपुर्वीच बुल्गेरियाच्या पोलिसांनी एटीएमद्वारे चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली होती.

पोलिसांनुसार, भारतातील एटीएम आणि त्या संबंधित सिस्टम हॅक करणे खूपच सोपे आहे. त्यामुळे हॅकर्स भारतीय एटीएम धारकांना निशाणा बनवतात. हॅकर्स क्लोनिंग आणि स्किमिंगद्वारे लाखो लोकांना गंडा घालतात. हे हॅकर्स पर्यटन व्हिजावर भारतात येतात व फसवणूक करून निघून जातात.

असे होते कार्ड क्लोनिंग –

हॅकर्स क्रेडिट-डेबिट कार्डचे क्लोनिंग करण्यासाठी खास स्किमरचा (एक डिव्हाईस) वापर करतात. स्किमरला स्वाइप मशीन अथवा एटीएममध्ये बसवले जाते. या मशीनचा वापर करताच कार्डची संपुर्ण माहिती डिव्हाईसमध्ये स्टोर होते. त्यानंतर हॅकर्स ही माहिती कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉपमध्ये टाकून क्लोन तयार करतात. या प्रक्रियेद्वारे हॅकर्स परदेशात बसून देखील युजरच्या खात्यातून संपुर्ण पैसे काढून घेतात.

लोक सायबर सुरक्षेबाबत जागृक नसल्याने या घटनांचे प्रमाण अधिक आहे. जर तुमच्यासोबत देखील अशी फसवणूक झाली तर तुम्ही सायबर क्राइम पोर्टलवर घटनेची तक्रार नोंदवू शकता.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी उपाय –

एटीएममधून पैसे काढताना सर्वात प्रथम चेक करा की, त्याच्या आजूबाजूला कोणते डिव्हाईस तर लावलेले नाही. जर मशीनचे स्किमिंग डिव्हाईस आणि की-पॅड लूज असेल तर कार्डचा वापर करू नका.

एटीएम पासवर्डचा वापर करताना दुसऱ्या हाताने की-पॅड झाका. नेहमी योग्य ठिकाणीच कार्डचा वापर करा.

Leave a Comment