चक्क लाईव्ह कार्यक्रमात अॅपल 'सिरी'ने केले अँकरच्या वक्तव्याचे खंडन - Majha Paper

चक्क लाईव्ह कार्यक्रमात अॅपल ‘सिरी’ने केले अँकरच्या वक्तव्याचे खंडन

सध्या तंत्रज्ञानाचा वापर एवढा वाढला आहे की, प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञान आणि मशीनद्वारे पार पडते. हे तंत्रज्ञान मनुष्याला देखील अनेकदा चुकीचे ठरवते. अशीच काहीशी घटना एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान घडली. एका टिव्ही कार्यक्रमादरम्यान हवामानाबद्दल भविष्यवाणी करणाऱ्या हवामानतज्ञाला अॅपल सिरीने मध्येच टोकल्याची घटना घडली आहे.

Tomasz Schafernaker बीबीसीसाठी लाईव्ह कार्यक्रमात हवामानाची माहिती देत होते. ते सांगत होते की, अमेरिकेच्या डेनव्हर आणि मिनीपोलिस येथे हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. मात्र तेव्हाच अचानक अॅपल वॉचमधून आवाज आला. व्हर्च्युअल असिस्टेंट सिरीने मधेच टोकत म्हटले की, हिमवर्षावाची काहीही शक्यता नाही.

या घटनेचा व्हिडीओ बीबीसी वेदरने ट्विटरवर शेअर केला असून, व्हिडीओ व्हायरल होत आहे. 28 सेंकदांच्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टॉमस हवामानाची माहिती देत असतानाच अचानक सिरी हिमवर्षाव होणार नसल्याचे म्हणते.

टॉमसने देखील शो दरम्यानच सिरीचा रिपोर्ट चुकीचा असून, सिरीला या लोकेशनची माहिती नसण्याची शक्यता वर्तवली. टॉमसने सांगितले की, त्यांनी सिरीला मॅन्युअली एक्टिवेट नव्हते की, त्यांच्या वॉचमध्ये ‘Raise to speak’ ऑप्‍शन आपोआप सुरू झाला होता.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

Leave a Comment