अन् विवाहबद्ध झाला क्रिकेटपटू मनीष पांडे - Majha Paper

अन् विवाहबद्ध झाला क्रिकेटपटू मनीष पांडे


मुंबईः सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात काल रात्री खेळून संघाला विजय मिळवून देणारा क्रिकेटपटू मनीष पांडे आज दुसऱ्या दिवशी विवाहबद्ध झाला आहे. दाक्षिणात्य भिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत मनीष पांडेने लगीनगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर या दोघांचेही फोटो व्हायरल होत आहेत.

रविवारी रात्रीपर्यंत गुजरातमधील सूरतमध्ये खेळवण्यात आलेला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा सामना रंगला होता. कर्नाटक संघाला मनीष पांडेने विजय मिळवून दिला व दुसऱ्याच दिवशी लग्नाचा बार उडवून दिला. मनीष पांडे व अभिनेत्री अश्रिता शेट्टी या दोघांच्या लग्नावरून महिनाभरापूर्वी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. ती आज अखेर खरी ठरली.

या चर्चेला मनीष पांडेच्या कुटुंबाने दुजोरा देत २ डिसेंबर रोजी या दोघांचा विवाह होणार असल्याची माहिती दिली होती. मनीष पांडे आणि अश्रिता हे दोघे सोमवारी मुंबईत पवित्र बंधनात अडकले. कर्नाटक संघाचा कर्णधार असलेला व ट्रॉफी जिंकल्यानंतर मनीष पांडेने आज लग्न करणार असल्याची माहिती काल दिली होती.

Leave a Comment