धुम्रपान सोडा आणि 6 दिवसांची भरपगारी रजा मिळवा

जापानच्या एका कंपनीने धुम्रपान सोडण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना 6 दिवसांची अतिरिक्त सवेतन सुट्टीची ऑफर दिली आहे. सिगरेट ब्रेकमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न निर्माण झाल्यानंतर ही ऑफर कंपनीकडून देण्यात आली.

टोकियोतील मार्केटिंग कंपनी पिआला आयएनसीचे ऑफिस बहुमजली इमारतीच्या 29 व्या मजल्यावर आहे. ज्या कर्मचाऱ्यांना सिगरेट ओढायची असेल त्यांना खाली बेसमेंटला जावे लागलेत. यामध्ये जवळपास 15 मिनिटे जातात. यामुळे सिगरेट न पिणाऱ्यांना ब्रेक मिळत नसल्याने नाराज होत असे.

कंपनीचे प्रवक्ता हिरोताका मत्सुशिमाने सांगितले की, एक वर्षापुर्वी तक्रार बॉक्समध्ये सीईओना सिगरेट ब्रेकविषयी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सिगरेट ब्रेक न घेणाऱ्या कर्मचाऱ्याला सवेतन 6 दिवसांची सुट्टी घेण्याची ऑफर दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ताकाओ असूका यांच्यानुसार, या ऑफरमुळे कर्मचारी सिगरेट सोडून देतील अशी आशा आहे. अन्यथा वेगळी कारवाई करावी लागेल.

 

Leave a Comment