अरेच्चा ! या शहरातील रस्ते व चौकांना नावच नाही

आजच्या काळात प्रत्येक रस्ता, गल्ली आणि सोसायटीला एक नाव दिलेले असते. मात्र जगात असेही एक ठिकाण आहे, जेथील रस्ते आणि चौकाला नावच नाही. तुम्ही विचार करत असाल की, जर असे असेल तर लोक पत्ता कसे सांगतात आणि त्यांना माहिती कसे पडते की कोण कोठे आहे ? याविषयी जाणून घेऊया.

(Source)

या जागेचे नाव हिलगर्मिसन असून, हे जर्मनीमध्ये आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्येच रस्त्यांना नावे देण्यात यावे की नाही याविषयी जनमत घेण्यात आले. कारण सध्या असलेले पत्ते येथील मूळ निवासी लोकांसाठी अवघड होते. येथील लोकांनी रस्त्याला कोणतेही नाव न देण्याच्या बाजूने मत दिले.

(Source)

हिलगर्मिसन शहर 1970 मध्ये छोट्या छोट्या गावांपासून तयार झाले आहे. येथे घरांचा नंबर आणि एका जुन्या गावाच्या नावाने पत्ता दिला जातो. म्हणजेच नंबर हाच येथील पत्ता आहे.

(Source)

या ठिकाणी सध्या 2200 लोक राहतात. यातील 60 टक्के लोकांनी रस्ता आणि चौकाला कोणत्याही प्रकारचे नाव देण्यात येऊ नये, या बाजूने मतदान केले.

(Source)

परिषदेद्वारे सुचविण्यात आले होते की, प्रत्येक गल्लीला एक नाव दिल्याने सेवा आणि डिलिव्हरी ड्रायव्हर्ससाठी काम सोपे होईल, मात्र स्थानिक लोकांनी यास नकार दिला.

Leave a Comment