चक्क पोलीस स्टेशनचा रिव्यू सोशल मिडियावर व्हायरल


आजकाल एखाद्या हॉटेल मध्ये किंवा एखाद्या रेस्टोरंटमध्ये जायचे असले किंवा अगदी एखादा चित्रपट पहायचा असला तरी सर्वप्रथम पहिले जातात त्या संबंधीचे रिव्ह्यू. कुणी ना कुणी तेथे गेलेला असतो आणि संबंधित ठिकाणाचा अनुभव त्याने शेअर केलेला असतो. त्यावरून संबंधित ठिकाण भेट देण्यायोग्य आहे वा नाही याचा निर्णय त्याला मिळालेले रेटिंग ठरवून घेणे सोपे होते. सोशल मीडियावर सध्या असाच एका ठिकाणाचा रिव्हु खुपच व्हायरल झाला आहे. हे ठिकाण चक्क एक पोलीस स्टेशन आहे तेही तामिळनाडू मधील.

लोगेश्वरन नावाच्या एका युवकाने चेन्नई मधील थिरुमुल्लावियोल टी १० या पोलीस स्टेशनचा रिव्यू लिहिला असून आपला अनुभव शेअर करताना प्रत्येक माणसाने या स्टेशनला एकदातरी भेट द्यायलाच हवी असा सल्ला दिला आहे. झाले असे की लोगेश्वरणला एका मध्यरात्री कागदपत्र जवळ नसताना बाईक चालविल्याप्रकरणी पोलिसांनी पकडून या स्टेशनवर आणले. त्यानंतर त्याची सर्व चौकशी करून त्याला सोडून दिले. तेथून बाहेर पडल्यावर लोगेश्वरणने पहिले काम केले ते या स्टेशनचा रिव्हु लिहिला आणि सोशल मिडियावर शेअर केला.

या स्टेशनला चार स्टार रेटिंग देताना तो लिहितो, हे पोलीस स्टेशन अतिशय स्वच्छ आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर आहे आणि इथला स्टाफ फारच चांगला आहे. त्यांनी मला कोणताही त्रास दिला नही, लाच मागितली नाही. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी या स्टेशनला भेट दिली पाहिजे. या रिव्ह्यूचा परिणाम असा झाला की गुगलवर या स्टेशनचे रेटिंग ३.७ होते ते हा रिव्ह्यू प्रसिद्ध झाल्यावर चोवीस तासात ४.२ वर गेले असल्याचे समजते.

Leave a Comment