गायिका लीज्जोची अजब फॅशन


हॉलीवूडची प्रसिद्ध सिंगर लीज्जो हिने काही दिवसांपूर्वी अमेरिकन म्युझिक अॅवॉर्ड सोहळ्यात जबरदस्त स्टेज परफॉर्मन्स दिला आणि नेहमीप्रमाणे तिच्याबद्दल चर्चा सुरु झाली. या वेळी तिचा ड्रेस आणि हातातली पर्स हे खास चर्चेचे विषय होते. ३१ वर्षीय लीज्जो चांगली जाडजूड आहे. तिने यावेळी फ्रीलचा तोकडा ऑरेंज ड्रेस घातला होता. अर्थात ती तिच्या हटके स्टाईलने नेहमीच चर्चेत असते.

या नारंगी ड्रेसवर तिने सफेत रंगाची वेलेंटिनो मायक्रो पर्स कॅरी केली होती. बार्बी डॉलच्या त्यांनी पर्स प्रमाणे ही पर्स अगदी लहान म्हणजे कदाचित जगातील सर्वात लहान पर्स असावी. लीज्जोने लांब वाढविलेल्या नखांवर ही पर्स लटकावून ठेवली होती. पोनी टेल, पर्सला शोभणारे पांढऱ्या पट्ट्याचे सँडल असा लीज्जोचा जामानिमा स्टायलिस्ट मार्को मोन्रोने करून दिला होता असे समजते.