हे आहे जगातील सर्वात मोठे समुद्री जहाज

टायटॅनिक जहाजाबद्दल तुम्ही ऐकले असेलच. एकेकाळी ते जगातील सर्वात मोठे समुद्री जहाज होते. मात्र आज ‘सिंफनी ऑफ द सीज’ हे जगातील सर्वात मोठे समुद्री जहाज आहे. या जहाजाची किंमत तब्बल 8711 कोटी रुपये आहे. यामध्ये जगभरातील सर्व सुविधा आहेत.

(Source)

या जगातील सर्वात मोठ्या समुद्री जहाजेची लांबी एखाद्या फुटबॉल मैदानापेक्षाही अधिक आहे. 2 लाख 30 हजार टन वजनाच्या या जहाजाची रुंदी 215.5 फूट आणि लांबी 1188 फूट आहे. याचा वेग ताशी 40.74 किलोमीटर आहे.

(Source)

या जहाजेवर लहान मुलांसाठी वॉटर पार्क आहे. याशिवाय 10 मजली स्लायडिंग तयार करण्यात आले आहे. जहाजाच्या मध्यभागी सेंट्रल पार्क आणि एकाभागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी बोर्डवॉक आहे.

(Source)

या 18 मजली जहाजावर एकूण 6780 प्रवाशांच्या राहण्याची सोय आहे. यावर 2175 आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कर्मचारी काम करतात. जहाजावर पूल अँन्ड स्पोर्ट्स झोन शिवाय सी स्पा आणि फिटनेस सेंटर, जिम आणि मनोरंजनसाठी थेअटरची सोय आहे.

(Source)

या जहाजात एकूण 2759 लग्झरी खोल्या आहेत. याच्या 2 मजल्यांवर केवळ हायक्लास फॅमिली सुइट तयार करण्यात आलेले आहेत. यावरील लिफ्टची संख्या 24 आहे.

Leave a Comment