त्सुनामीत उद्धवस्त झालेल्या लाकडांपासून बनविले 5 मजली स्टेडियम

जापानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिकच्या मुख्य स्टेडियमचे काम पुर्ण झाले आहे. हे स्टेडियम बनविण्यासाठी 87 टक्के लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. यात 2000 घन मीटर देवदाराच्या लाकडाचा वापर करण्यात आलेला आहे. ही लाकडं 2011 मध्ये जापानमध्ये आलेल्या त्सुनामीनंतर उद्धवस्त झालेल्या जंगलातून आणण्यात आली आहे. जापानमधील 45 प्रांतातील लाकडाचा वापर यासाठी करण्यात आलेला आहे.

स्टेडियमसाठी लाकडांचा वापर करण्यामागे उद्देश आहे की, प्रेक्षक निसर्गाशी जोडलेले राहावे आणि त्यांना गरम देखील होऊ नये. यासाठी 150 मोठे पंखे आणि 8 ठिकाणी कूलिंग नोजल लावण्यात आलेले आहे. या 5 मजली स्टेडियमची निर्मिती करण्यासाठी तब्बल 10 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. येथे 60 हजार प्रेक्षक बसू शकतात.

या स्टेडियमचे डिझाईन ऑर्किटेक्ट केंगो कुमा यांनी तयार केले आहे. येथे पहिली स्पर्धा पुढील वर्षी 1 जानेवारीला एंपरोर फुटबॉल कपचा अंतिम सामना खेळला जाईल. टोकियो ऑलिम्पिक 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान पार पडेल.

ऑलिम्पिकची 60 टक्के ठिकाण ही रियूज्ड आणि रिसायकल्ड वस्तूंपासून बनविण्यात येत आहेत. ऑलिम्पिकमध्ये ई-वेस्ट पासून तयार करण्यात आलेली 5000 मेडल देण्यात येतील.

Leave a Comment