वॉरेन बफेंना मागे टाकत हे बनले जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार

मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी सारख्या जगातील सर्वश्रेष्ठ युनिवर्सिटीत शिकलेले गणितज्ञ जिम सिमन्स आज जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार आहेत. त्यांनी 1978 मध्ये गुंतवणूकदार होण्यासाठी गणित क्षेत्रातील यशस्वी करिअर सोडले. 1980 च्या दशकात त्यांनी सुरूवातीला बाँड, करंसी आणि दुसऱ्या गुंतवणूक माध्यमात क्रूड कॉम्प्यूटर ट्रेडिंग मॉडेल आणि स्वतःच्या समजूती प्रमाणे गुंतवणूक केली. मात्र त्यांचे मोठे नुकसान झाले. ग्राहकांच्या तक्रारी सुरू झाल्या. इतर गणितज्ञांना देखील समजत नव्हते की त्यांनी असे का केले ? मात्र आज ते जगताली सर्वात यशस्वी गुंतवणूकदार आहेत.

ते एवढे यशस्वी आहेत ती, त्यांचे नाव आज वॉरेन बफे आणि जॉर्ज सोरास सारख्या इनव्हेस्टर्स सोबत घेतले जाते. त्यांना आता वॉल स्ट्रीटमधील सर्वात महान गुंतवणूकदार म्हटले जाते.

सिमन्स यांनी 1982 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी रिनेसन्स टेक्नोलॉजीची स्थापना केली. याचे एक उत्पादन मेडालियन फंडने 1988 ते 2018 पर्यंत 100 अब्ज डॉलरचा ट्रेडिंग नफा कमवला आहे. फीच्या आधी याचे सरासरी वार्षिक रिटर्न 39 टक्के आहे. तर याच काळात वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेचे रिटर्न 16 टक्के होते. म्हणजेच 1988 मध्ये जर कोणी सिमन्स यांच्या फंडमध्ये ज्यांनी 1 डॉलर लावले असते, तर त्यांना आता जवळपास 27 हजार डॉलर मिळाले असते. तर बर्कशायर हॅथवेमध्ये केवळ 107 डॉलर मिळाले असते.

आज सिमन्स यांची 21 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. सुरूवातीला ते मार्केटच्या ट्रेंड आणि करंसीच्या आधारावर अंदाल लावून गुंतवणूक करत असे. मात्र त्यात ते यशस्वी झाले नाहीत. मात्र नंतर सिमन्स यांनी मित्रांच्या सल्ल्यावरून उद्योगात गणिताचा वापर करण्यास सुरूवात केली.

Leave a Comment