तब्बल 18000 वर्ष बर्फात गोठलेले होते हे ‘पिल्लू’

आतापर्यंत मानवी सभ्यतेविषयी जोडलेल्या अनेक जुन्या गोष्टी सापडलेल्या आहेत. मात्र वैज्ञानिकांना यंदा 18000 वर्ष जुने कुत्र्याचे पिल्लू सापडले आहे. या पिल्लूच्या शोधामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे पिल्लू मागील वर्षी सायबेरियामध्ये सापडले होते.

हे कुत्र्याचे पिल्लू आहे की कोल्ह्याचे याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. वैज्ञानिक शक्यता वर्तवत आहे की, हे पिल्लू जंगली प्राणी कुत्र्यामध्ये परावर्तीत होत असतानाची प्रजाती असावी.

हे पिल्लू अनेकवर्ष बर्फात असल्याने त्याचे केस, दात आणि जबडा तसेच्या तसे आहेत. सेंटर फॉर पिलिओजेनेटिक्सचे रिसर्चर डेव्ह स्टँटन म्हणाले की, आमच्याकडे बरेच प्राचीन सॅम्पल्स आहेत, मात्र हा सर्वाधिक सुस्थितीत असलेला नमूना आपल्याला सापडला आहे.

हे पिल्लू सध्या रशियामध्ये असून, स्वीडन आणि इंग्लंडच्या वैज्ञानिक देखील या बद्दल जाणून घेण्यासाठी आकर्षित झाले आहेत. त्याच्या हाडांचे परिक्षण करण्यात येत असून, मृत्यूच्या वेळी पिल्लूचे वय 2 महिने असण्याची शक्यता आहे.

कुत्र्यांची उत्क्रांती कोल्ह्यातून झाल्याचे सांगण्यात येते, मात्र ही उत्क्रांती कधी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका रिसर्चनुसार, 20,000 ते 40,000 वर्षांपूर्वी कोल्ह्यातून कुत्र्याची उत्क्रांती झाल्याची शक्यता आहे.

या पिल्लूचे नाव डॉगॉर ठेवण्यात आलेले आहे. तपासणीनंतर देखील हे पिल्लू कोल्ह्याची प्रजाती आहे की कुत्र्याची हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment