ई-फार्मसींना औषधे साठवण्यास मनाई

औषधांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई-फार्मसी फ्लॅटफॉर्म आता स्वतःकडे औषध जमा करू शकणार नाहीत. छोटे व्यापारी आणि विक्रेत्यांबरोबर भागीदारी करून औषध ग्राहकांपर्यंत पोहचवली जातील. यासाठी आरोग्य मंत्रालयाने ई-फॉर्मसी नियमांमध्ये बदल केले आहेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आता केवळ ऑर्डर बुक करता येणार आहे. औषधांची डिलिव्हरी छोटे व घाऊक व्यापारी करतील.

ई-फार्मसीद्वारे देण्यात आलेले प्रिस्किप्शन देखील व्यवस्थित ठेवावे लागेल. डॉक्टरांनी सांगिंतल्याप्रमाणेच औषधे द्यावे लागतील. एंटीबायोटिक्सच्या बाबतीत याची विशेष काळजी घेतली जाईल. प्रिस्क्रिप्शनशिवाय एंटीबायोटिक्स औषधांची विक्री न करण्याच्या स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहेत.

सरकारने पहिल्यांदाच दुकानदारांना औषधे ग्राहकांच्या घरी पोहचवण्याचे अधिकार दिले आहेत. आतापर्यंत हे गैर कायदेशीर होते. देशात ई-फॉर्मसीच्या आतापर्यंत 50 प्लॅटफॉर्म आहेत. तर औषधांची जवळपास 8 लाख दुकाने आहेत.

Leave a Comment