नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

विधानसभा अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपकडून किसन कथोरे यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होण्याची परंपरा आहे.

 

नाना पटोले हे याआधी भाजपचे खासदार होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यावर टीका करत भाजप सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी नागपूरमधून काँग्रेसच्या तिकीटावर नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी किसन कथोरे यांना नामांकित केले होते. मात्र आमदारांच्या निवेदनानंतर आम्ही त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment