… म्हणून चक्क प्रवाशाने उडवले विमान

पुण्यावरून दिल्लीच्या दिशेने उड्डाण घेतलेल्या इंडिगोच्या फ्लाइटला एका प्रवाशाने उडवल्याची घटना घडली आहे. मात्र पायलट हा कोणीही सामान्य व्यक्ती नव्हता तर कमी दृश्यमानतेमध्ये (लो व्हिजिबिलिटी) विमानाचे उड्डाण घेण्यात प्रशिक्षित होता. आयजीआय विमानतळावर लो व्हिजिबिलिटी (CAT III B) असल्यामुळे इंडिगोने एक्सपर्ट पायलटला विमान उडवण्यास सांगितले. त्यामुळे त्याने विना गणवेशाचेच फ्लाइट ऑपरेट केली.

इंडिगोच्या सुत्रांनुसार, जेव्हा सर्व प्रवासी विमानात पोहचले तेव्हा आमच्या लक्षात आले की दिल्लीतील व्हिजिबिलिटी कमी होत आहे. डिसेंबरमध्ये दिल्लीवरून येणाऱ्या सर्व उड्डाणांसाठी CAT III B ट्रेंड पायलट्स ठेवले जातात. शनिवारी सकाळी अशाच प्रकारे अचानक व्हिजिबिलिटी कमी असल्याची माहिती मिळाली.

फ्लाइट 6E-6571 साठी जो कॅप्टन होता, तो CAT III B प्रशिक्षित नव्हता. को-पायलट प्रशिक्षित होता, मात्र नियमांनुसार, अशावेळी दोन्ही पायलट CAT III B प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. यावेळी विमानातून एक CAT III B ट्रेंड कॅप्टन प्रवास करत होता. त्यामुळे त्यांना विमानाचे उड्डाण घेण्यास सांगण्यात आले.

CAT III B ट्रेंड कॅप्टन बोलवण्यात आला असता तर उड्डाण घेण्यास आणखी उशीर झाला असता, त्यामुळे त्यांनी प्रवास करणाऱ्या पायलटलाच विमान ऑपरेट करण्यास सांगितले.

Leave a Comment