या बुलेट प्रुफ सिंहासनात ठेवल्या आहेत 7 कोटींच्या नोटा

रशियाची राजधानी मॉस्को येथील एका आर्ट म्यूझियममध्ये 2.5 इंच बुलेटप्रुफ काचेचे सिंहासन ठेवण्यात आलेले आहे. या सिंहासनाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात 7 कोटी रुपयांच्या (1 लाख डॉलर) नोटा ठेवण्यात आलेल्या आहेत. या सिंहासनावर बसण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना बोलवण्यात आले आहे.

या सिंहासनाचे नाव एक्स10 मनी थ्रोन आहे. याला रशियाचा पॉप कलाकार एलेक्सी सर्जियेंकोने उद्योजक इगोर राइबाकोवबरोबर मिळून बनवले आहे. सिंहासन बनवणे आणि यावर बसायला बोलवणे या मागे उद्देश लोकांना पैशाची ताकद कळावी व ते कमवण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

एलेक्सी सर्जियेंको म्हणाले की, जे पैशांची ताकद समजतात आणि जे नेहमी पैसे कमवण्याचा विचार करतात, अशांना हे सिंहासन प्रेरणा देईल. 8 वर्षांपासून मी आर्ट प्रोजेक्ट तयार करत आहे. त्यातील अनेकांचा लोकांवर प्रभाव आहे. लोकांनी पैशाविषयी बोलावे, त्याविषयी विचार करावा आणि अधिक कमाई करावी, यासाठी हे सिंहासन आहे. यामुळे आपला देश अधिक श्रीमंत होईल.

Leave a Comment