…तर 2024 पर्यंत गांगुलीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत लोढा कमेटीच्या शिफारसीमध्ये बदल करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. उच्च पदांवरील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यात यावे यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला असून, या मंजूरी मिळाल्यास बीसीसीआयचे अध्यक्ष सौवर गांगुली यांचा कार्यकाळ वाढवला जावू शकतो. गांगुली यांची ऑक्टोंबरमध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांचा 9 महिन्यांचा कार्यकाळ जुलैमध्ये समाप्त होईल. प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास त्यांचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढेल. तर बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसी चीफ एग्झिक्यूटिव्ह कमेटीच्या बैठकीत बोर्डाचे प्रतिनिधित्व करू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांनुसार, कोणताही पदाधिकारी बीसीसीआय अथवा राज्य संघात तीन वर्षांचे दोन कार्यकाळ पुर्ण करत असेल तर त्याला 3 वर्ष अनिवार्य ब्रेक घ्यावा लागेल. गांगुली बंगाल क्रिकेट बोर्डाचे 5 वर्ष 3 महिने अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ 9 महिन्यांचा कार्यकाळ आहे.

आज झालेल्या बैठकीत हा अनिवार्य ब्रेक काढण्याविषयी चर्चा झाली. मागील 3 वर्षात आयसीसीमध्ये बीसीसीआयचे वर्चस्व थोडे कमी झाले आहे. बोर्डाची इच्छा आहे की, 70 वर्ष वयाची मर्यादेचा नियम हटवण्यात यावा. बोर्डाचे म्हणणे आहे की, आयसीसीमध्ये एखादी अनुभवी व्यक्ती बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करेल. या स्थितीमध्ये बोर्डाचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा बीसीसीआयकडून आयसीसीच्या बैठकीत सहभागी घेण्याचा मार्ग मोकळा होईल.

Leave a Comment