कापूर – छोट्या मोठ्या आजारात प्रभावी औषध


कापूर हा विशिष्ट झाडांपासून बनविला जाणारा सुगंधी पदार्थ घरात, मंदिरात पूजा करताना आवर्जून वापरला जातो. देवाची कापूर आरती करण्याची प्रथा भारतात सर्वत्र आहे. हा कापूर आयुर्वेदात एक घरगुती औषधी म्हणून महत्वाचा मानला गेला असून त्याचे अनेक उपयोग आहेत. इतकेच नव्हे तर त्वचा, केस, स्नायू यांचे अनेक विकार त्याने दूर करता येतात.

कापूर आणि त्याचे तेल यांचा वापर अनेक औषधे बनविताना केला जातो. त्यापासून अनेक मलमे बनविली जातात. पोटदुखी असेल तर एक ग्लास पाण्यात १ चमचा ओवा घालून ते पाणी उकळवून अर्धे झाले कि त्यात थोडा कापूर घालून प्यायल्याने दुखण्याला उतार पडतो. सांधेदुखित कापूर तेलाचे मालिश केल्यास बरे वाटते तसेच खाज, इन्फेक्शन यावर खोबरेल तेलात कापूर घालून चोळण्याने आराम पडतो. भाजले असेल तर त्या ठिकाणी कापूर तेल लावल्यास जळजळ थांबते आणि संसर्ग होत नाही. इतकेच नव्हे तर घरात कापूर जाळला तरी घरातील जंतू नष्ट होतात.


तोंडावर मुरमे, पुटकुळ्या येत असतील तर खोबरेल तेल आणि कापूर यांचे मिश्रण त्वचेवर चोळल्यास डाग राहत नाहीत. कोमट पाण्यात कापूर आणि थोडे मीठ घालून पाय बुडवून बसले तर टाचेच्या भेगा कमी होतात. ओलिव्ह तेलात कापूर घालून त्याने डोक्याला मसाज केल्यास स्ट्रेस, डोकेदुखी थांबते. दातदुखी असेल तर कापूर पावडर दातात धरली तर दात दुखायचा थांबतो.


सर्दी खोकला झाल्यास खोबरेल तेल आणि कापूर यांचे मिश्रण छाती, डोक्यावर चोळावे. आराम पडतो. जुलाब होत असतील तर ओवा, कापूर आणि पेपरमिंट समप्रमाणात घेऊन काचेच्या बरणीत उन्हात ठेवावे. ६ -८ तासानंतर मिश्रणाचे ४-५ थेंब टाकून सरबत घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दुध आणि कापूर पावडर कापसाने चेहऱ्यावर लावावी आणि १५ मिनिटाने धुवावे. त्वचा चमकदार आणि हेल्दी होते. कापले किंवा कोणत्याची कारणाने जखम झाली तर कापूर मिश्रित पाणी लावावे. तोंड आल्यास शुद्ध तुपात कापूर घालून सेवन केल्यास उतार पडतो.

पर्यटन अथवा ट्रेकिंग साठी अधिक उंचीच्या ठिकाणी गेल्यास अनेकदा श्वास घ्यायला त्रास होतो, चक्कर येते अश्यावेळी कापूर नुसता हुंगला तरी आराम पडतो

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment