ट्विटरवर ट्रेंड होत आहे #Nirbhaya


मुंबई – सध्या देशभरात दिल्लीतील बहुचर्चित निर्भया बलात्कार प्रकरणांची वांरवार पुनरावृत्ती होत असल्यामुळे, नेटकऱ्यांनी सध्या ट्विटरवर #Nirbhaya ही मोहिम राबवत महिलांच्या सुरक्षिततेची गरज व्यक्त केली. तसेच याप्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

नेटकऱ्यांनी ट्विटरवर तामिळनाडूमधील कांचीपुरम, हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्काराचा उल्लेख करत ट्विट केले आहेतय. त्यामुळे ट्विटरवर हैदराबादसह तामिळनाडूमधील पीडितेच्या नावाचे हॅशटॅग ट्रेंड करत आहे. तर निर्भयाच्या आरोपींना अद्याप शिक्षा मिळाली नसल्यामुळे ट्विटरवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे निर्भया हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

राजस्थानमधील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न झाले होते. तिच्यावर पतीसह चार जणांनी अपहरण करून सामूहिक बलात्कार केला. बंडी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सतनाम सिंह यांनी ही माहिती दिली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
त्याचबरोबर तामिळनाडूमधील कांचीपुरम येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकण्यात आले. त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच दुसऱ्या एका महिलेलाही जाळून टाकल्याची घडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये खळबळ उडाली आहे.

यावर रोष व्यक्त करताना नेटकऱ्यांनी तुम्हाला कोणता अनोळखी जरी विश्वासू वाटला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या अवतीभोवती राक्षस फिरत आहेत. तुमची सुरक्षा तुमच्या हाती आहे. कठोर शिक्षा निर्भयाच्या आरोपींना झाल्याशिवाय समाजात स्वच्छता होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यावर तात्काळ कार्यवाही करावी, असे ट्विट करून नटेकऱ्यांनी मागणी केली आहे.

धार्मिक-जातीय रंग बलात्कार प्रकरणाला दिल्याबद्दलही एका नेटकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. कोणीही पीडिता अथवा तिच्या कुटुंबाबत बोलत नाही. कोणत्या धर्माची पीडित होती म्हणून तिला दोष देवू नका, अशी अपेक्षा वापरकर्त्याने व्यक्त केली आहे.

बलात्कारातील आरोपीला चीनमध्ये मृत्यूदंड, दक्षिण कोरियात जाळून तर इस्त्राईलसह अफगाणिस्तानमध्ये फाशीची शिक्षा दिली जाते. तर भारतात बलात्कार प्रकरणातील आरोपींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त राग व्यक्त व्यक्त केला जातो. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या दयेचा अर्ज प्रलंबित, अशा शब्दात एका नेटकऱ्याने म्हटले आहे. हैदराबादमधील पीडितेचा जळालेला फोटो एका नेटकऱ्याने पोस्ट करुन अश्रू दर्शविणारी इमोजी पोस्ट केली आहे. त्या फोटोतील जळालेल्या पीडितेचा देह झाकलेला दाखविण्यासाठी माझ्याकडे टूल्स नाहीत, असे म्हणत त्याने दु:ख व्यक्त केले आहे.

Leave a Comment