मुंबईच्या पॉश परिसरात टायगर श्रॉफचा नवा आशियाना


मुंबईच्या पॉश अशा समजल्या जाणाऱ्या खारमध्ये 8 बेडरुमचे आलिशान घर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने विकत घेतले आहे. पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यात टायगर आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या घरात राहायला जाणार आहे. याबाबत स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, जॉन अब्राहमचा भाऊ अलान टायगरच्या नव्या घराचे इंटिरिअर करणार आहे. हे घर सजवण्यासाठी त्याला टायगरची आई आयेशा श्रॉफ मदत करत असल्याचेही स्पॉटबॉयने सांगितले आहे. टायगर गेल्या काही दिवसांपासून नव्या घराच्या शोधात होता. पण, त्याला आपल्या मनाप्रमाणे घर सापडत नव्हते.

दरम्यान, जॉन अब्राहमचे घर टायगर श्रॉफला आवडले होते. अलाननेच जॉनच्या घराची सजावट केल्यामुळे टायगरने आपल्या नव्या घराच्या इंटिरिअरची जबाबदारी अलानवर सोपवली आहे. आपल्या घरातील एक कोपरा टायगरने जिमसाठी राखून ठेवला आहे. टायगरचे आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष असते. त्यामुळे त्याने आपल्या नव्या घरात जिमसाठी जागा ठेवली आहे. बॉक्स ऑफिसवर टायगरच्या ‘वॉर’ चित्रपटाने चांगला गल्ला जमावला. टायगर आणि ऋतिक रोशन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. आता टायगर ‘बागी 3’ चित्रपटात दिसणार आहे. टायगरची ‘बागी 3’ चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे.

टायगरसोबत बागी चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. तसेच दुसऱ्या भागात दिशा पटानीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. परंतु, आता बागी 3 चित्रपटात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment