सिंगापूरमधील या इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर आहे स्वीमिंग पूल


जगातील सर्वात सुंदर देशांमध्ये सिंगापूरची गणना होते. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली एक भन्नाट जागा येथे आहे. पर्यटकांचे लक्ष येथील रस्ते, गगनचुंबी इमारती वेधून घेतात. त्यातच एका इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर असलेला एक स्वीमिंग पूल तर येथील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जगातील सर्वात लांब स्वीमिंग पूल म्हणून या स्वीमिंग पूलची ओळख आहे.

१५० मीटर लांब हॉटेलच्या छतावर असलेला हा पूल आहे. स्वीमिंगसोबत येथे सनबाथचीही व्यवस्था आहे. साधारण २, ५०० रूम असलेल्या या हॉटेलच्या छतावरील या स्वीमिंग पूलच्या किनाऱ्यावर खजूराची झाडे लावण्यात आली आहेत. जवळपास १.९ लाख किलोग्रॅम स्टेनसेल स्टीलपासून हा स्वीमिंग पूल तयार करण्यात आला आहे. सूर्यास्ताचा नजाराही येथून बघण्यासारखा असतो. सिंगापूरमधील फाइव्ह स्टार हॉटेलच्या छतावर असलेल्या पूलमध्ये साधारण १४ लाख लिटर पाणी असते.

Leave a Comment