
शहराकडील भागात पाणी येण्याची आणि जाण्याची एक ठराविक वेळ ठरलेली असते. त्यादरम्यान जर तुम्ही कुठे बाहेर गेला असाल तर काय पंचायत होते हे तर आपल्याला माहितच आहे. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण ज्यावेळी नळाला पाणी येईल त्याचवेळी त्याची माहिती तुमच्या मोबाइलवर मिळेल. तुमच्या मोबाइलवर नळाला पाणी आल्यानंतर फोन येतो. तुमच्या घरावर लावलेल्या टाकीत पाण्याचा सप्लाय फोन उचलताच सोडण्यात येईल. जर तुम्हाला वाटले की, पाण्याची टाकी भरली आहे तर त्याच क्रमांकावर फोन करून तुम्ही पाण्याचा सप्लाय बंद करु शकता.
राजस्थानच्या तरुणाने बनवले मोबाइलच्या माध्यमातून पाण्याची बचत करणारे डिव्हाइस
या प्रकारचे डिव्हाइस राजस्थानातील एका छोट्याशा गावातील कमल किशोर सोळंकीने तयार केले आहे. ज्यामुळे पाणी आल्यावर आणि गेल्यावर इतडे-तिकडे धावपळ करावी लागणार नाही. डिव्हाइसच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलवर नळाला पाणी येताच फोन येईल. घरावरील पाण्याच्या टाकीत फोन उचलताच पाण्याचा सप्लाय सुरु होईल. जर तुम्हाला वाटले टाकी भरली आहे तर तोच क्रमांक डायल केल्यानंतर पाण्याचा सप्लाय आपोआप बंद होईल.
फक्त 900 रुपयांत हे डिव्हाइस तयार करण्यात आले आहे. यामध्ये सेंसर आणि एक गिअर बॉक्स लावण्यात आला आहे. राजस्थानात पाण्याची बचत करण्यासाठी हे डिव्हाइस उपयुक्त ठरणार असल्याचे नंदकिशोर सोळंकीने सांगितले. केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी नंदकिशोरचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, असे डिव्हाइस प्रत्येक घरात बसवल्यास राजस्थानच नाही तर संपूर्ण देशात व्यर्थ वाहणाऱ्या पाण्याची बचत करता येऊ शकते.
अशा प्रकारच्या डिव्हाइसचा उपयोग शेतातील विहिरी आणि बोअरवेलमध्ये होतो. वीज आल्यानंतर या डिव्हाइसमुळे तुमच्या मोबाइलवर माहिती मिळते आणि घरबसल्या विहिरीवरील पंप शेतकरी सुरु करू शकतात. उत्तर प्रदेश, हरियाणासह अनेक राज्यांत अशा डिव्हाइसचा उपयोग करत आहेत.
