हैदराबाद बलात्कारप्रकरणी पायल रोहतगीचे आक्षेपार्ह वक्तव्य


आपल्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळेच अभिनेत्री पायल रोहतगी जास्त चर्चेत असते. हैदराबाद येथील महिला पशुचिकित्सकाची हत्या आणि बलात्कारावर पायलने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिला या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली.

पोलिसांनी सामुहिक बलात्काराप्रकरणी चारजणांना अटक केली आहे. यात दोन वाहनचालक आणि एक क्लीनर होता. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणी पायलने ट्विट करत राम राम जी, मुस्लिम परिसरात एका हिंदू मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली. तिच्या याच ट्विटमुळे लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका युझरने लिहिले की, रिकाम्या डोक्यात असे विचार येतात. हिला कोणी बोलायला सांगितले. तर आणखी एका युझरने लिहिले की, थोडी तरी लाज बाळग. यातही तू हिंदू- मुस्लिम आणतेस?

हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर गुरुवारी रात्री सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितेचे अपहरण केले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. लवकरच आरोपींना प्रसारमाध्यमांसमोर उभे करण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले.