एवढी आहे हिटमॅन शर्माची वार्षिक कमाई


चालु वर्ष भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी आतापर्यंत देखील चांगले गेले आहे. रोहितने २०१९ विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज खेळ करत ५ शतके झळकवल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्येही रोहितला सलामीला येण्याची संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत रोहितने आक्रमक खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. कॉर्पोरेट कंपन्यांनी रोहितच्या या खेळीचा चांगलाच फायदा घेतलेला दिसत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित सध्याच्या घडीला तब्बल २० पेक्षा अधिक उत्पादनांचा ब्रँड अँबेसिडर म्हणून काम करत असून रोहित यापैकी सीएट टायर्स, आदिदास, हबलॉट वॉचेस, रेलिस्प्रे, रसना, ट्रूस्को, शार्प इलेक्ट्रॉनिक्स, ड्रिम 11 अशा महत्वाच्या कंपन्यांच्या उत्पादनाच्या जाहीरातीत काम करतो. पण तो यातून किती कमाई करतो याची नेमकी आकडेवारी समजू शकली नसली, तरी देखील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार वर्षाकाठी तब्बल ७५ कोटींपेक्षा जास्त रकमेची वाढ रोहितच्या कमाईत होऊ शकते.

सध्या कोणत्याही उत्पादनाची जाहीरात करण्यासाठी रोहित एका दिवसाचे १ कोटी रुपये घेतो. रोहितची विश्वचषकातील ५ शतके आणि नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकांमधील धडाकेबाज कामगिरीमुळे रोहितकडे कंपन्यांचा ओढा वाढलेला आहे. कंपन्यांना सध्या आपली उत्पादने बाजारात आणण्यासाठी रोहितचा चेहरा हा खूप जवळचा वाटत असल्याची माहिती रोहितच्या टीममधील एका सदस्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

Leave a Comment