ध्येय गाठण्यासाठी निर्णयक्षमता, कुशलता गरजेची


प्रत्येक संस्था किंवा कंपनी दरवर्षी ध्येय किंवा लक्ष्य निश्‍चित करते. यानुसार कर्मचारी देखील स्वत:चे लक्ष्य निश्‍चित करत असतात. जर कंपनीतील वरिष्ठांनी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य तऱ्हेने ध्येय निश्‍चित केले तर त्यातून निर्णयाचे स्पष्ट रुप समोर येते. ध्येय गाठण्यासाठी वेळेचे टायमिंग, निर्णयक्षमता आणि कुशलता असणे गरजेचे आहे.

स्मार्ट व्हा – ध्येय स्मार्ट असायला हवे. म्हणजेच सुस्पष्टता असणे, मूल्यमापनासाठी योग्य देणे, ध्येय मिळवण्यास पात्र असणारा कर्मचारी वर्ग, सामुदायिक आणि वेळ केंद्रित असे स्मार्ट ध्येयाचे साधारण स्वरुप असावे. ध्येयप्राप्तीसाठी कंपनीच्या वरिेष्ठांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला हवा. या संवादातून आपण कसे ध्येय गाठले आणि ते ध्येय कसे साध्य करता येईल याचे अनुभव सहकाऱ्यांजवळ व्यक्त करावेत. अनुभवाच्या आणि मार्गदर्शनाच्या जोरावर कर्मचाऱ्यांना लक्ष्य गाठणे सोपे जाते.

व्हिजन महत्त्वाचे – ध्येय निश्‍चित करणे आणि ते मिळवण्यासाठी लिडरची भूमिका महत्त्वाची असते. जर कंपनी कोणत्याही धोरणाशिवाय किंवा भूमिकेशिवाय काम करत असेल तर मार्ग चुकण्याची शक्‍यता अधिक असते. आपण लहानसहान लक्ष्य गाठून तयार झालेला दृष्टीकोन कर्मचाऱ्यांसमोर मांडण्याची गरज आहे. यातून कर्मचाऱ्यांना कामाची योग्य जाण होईल आणि लक्ष्य गाठण्यासाठी आपल्या पातळीवर योजना तयार करू शकू.

संदर्भ द्या – ध्येय निश्‍चितीसाठी वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांना योग्य तऱ्हेने संदर्भ देणे महत्त्वाचे आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करणे महत्त्वाचे आहे.
जेणेकरून कंपनीलाही त्याचा फायदा होईल. आपल्या टिमचे लक्ष्य वास्तवतेला धरून असणे गरजेचे आहे. जर आपले ध्येय काल्पनिक असेल तर कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान होण्याचीच शक्‍यता अधिक आहे.

मोठ्या ध्येयाची विभागणी – जर कर्मचाऱ्यांनी एखाद्या विशेष ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर चांगले परिणाम येण्यास मदत मिळू शकते. मोठमोठे लक्ष्य
गाठण्यासाठी त्याची विभागणी लहान लहान ध्येयात करा. यशस्वीतेसाठी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वेगाने काम सुरवात करणे गरजेचे आहे. कंपनीत आपण ध्येय मिळवण्याची साधने आणि मार्ग जेवढी साधी ठेवू तेवढे अडथळे कमी राहतील.

बदलाची परवानगी – व्यवसाय करताना बदलत्या वातावरणात अनेक गोष्टी सारख्या बदलत जातात. त्यानुसार ध्येयात बदल करणे महत्त्वाचे ठरते. बाहेरच्या वातावरणात बदल झाला तर त्याचा परिणाम ध्येयावर आणि कंपनीच्या धोरणावर होत असतो. यासाठी कर्मचाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी सजग राहणे महत्त्वाचे आहे. जर आपण जीवनात बदल घडवून आणला नाही तर आपण ठरवलेल्या वेळेत लक्ष्य गाठू शकणार नाही. आपल्याला आपल्या कंपनीत कर्मचाऱ्यांना बदल करण्याची परवानगी द्यायला हवी. जर बदलाची परवानगी दिली नाही तर कर्मचारी कार्यक्षमता सिद्ध करू शकणार नाही.

Leave a Comment