उद्धव ठाकरेंकडून आरेमधील कारशेडच्या कामाला स्थगिती


मुंबई – निवडणुकी दरम्यानच्या प्रचारावेळी सरकार आल्यावर आरेतील वृक्षतोडीसंदर्भात ठाम भूमिका घेईन, असे आश्वासन देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरेंचा मुंबईत विधीमंडळ वार्ताहर संघाकडून सन्मान करण्यात आला. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रातोरात झाडांची कत्तल करणे चुकीचे होते. विकासाला आमचा विरोध नाही, पण कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. ते काम त्याचा संपूर्ण आढावा घेतल्याशिवाय सुरु करु दिले जाणार नसल्याचे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आरेतील एकाही पानाला धक्का लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आरेतील प्रकरणाचा मोठा निर्णय घेतला.

Leave a Comment