ही आहेत देशातील सर्वात भ्रष्ट राज्य


मुंबई : आपल्यापैकी अनेकांना भ्रष्टाचार मुक्त राज्य हवे असते. पण आपल्या देशात कोणतेही काम चिरीमिरी घेतल्याशिवाय होत नाही हे कट्टुसत्य आहे. ते नाकारता येणार नाही. त्यातच आता सुमारे 1 लाख 90 हजार लोकांचा प्रतिसाद मिळविणाऱ्या सर्वेक्षणानुसार आपण लाच घेतल्याचे 51 टक्के भारतीयांनी मान्य केले आहे. 51 टक्के लोकांनी वर्षभरात भ्रष्टाचार केला आहे. सर्वात जास्त लाच मालमत्ता नोंदणी केंद्र, पोलिस खाते आणि नगरपालिका या सरकारी ठिकाणी मागितल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. 1 लाख 9० हजार लोकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. पण विशेष म्हणजे या सर्वेक्षणात सर्वात जास्त भ्रष्टाचार करणाऱ्या आठ राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश नाही.

भारताची भ्रष्टाचारी देशाच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. पासपोर्ट आणि रेल्वे तिकीटासारख्या सुविधा केंद्र यासारख्या सरकारी सुविधा संगणीकृत केल्याने भारतात भ्रष्टाचारात घट झाल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. या सर्वेक्षणात सर्वात जास्त भ्रष्टाचार सरकारी कार्यालयांमध्ये होत असल्याचे दिसून आले आहे. राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडूचा देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी राज्यांमध्ये समावेश आहे.

Leave a Comment