तेजस एक्सप्रेसच्या क्रू मेंबर्सना छेडछडाची तक्रार करणे पडले महागात


मुंबई : काही कारणांमुळे देशातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस सध्या चर्चेत असून आता तेजस एक्सप्रेसमध्ये कार्यरत असलेल्या 20 क्रू मेंबर्सला नारळ देण्यात आला आहे. 11 महिला आणि 9 पुरूषांचा यामध्ये समावेश आहे. अवघे 2 महिने ट्रेन सुरू होऊन झाले असताना ही कॉर्पोरेट ट्रेन वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

4 नोव्हेंबर रोजी या 20 क्रू मेंबर्सना काढून टाकण्यात आले आहे. कॉन्ट्रॅक्टवर हे क्रू मेंबर्स काम करत असून त्यांना महिन्याला भत्ता दिला जात असे. नोकरीवरून काढून टाकलेल्या क्रु मेबर्सचे असे म्हणणे आहे की, अन्यायाविरूद्ध त्यांनी आवाज उठवल्यामुळे आम्हाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

या क्रू मेंबर्सकडून जबरदस्ती 18 तास काम करून घेतलं जात असे. तसेच ठरवल्यापेक्षा कमी पगार दिला जात होता. तसेच महिला क्रू मेंबर्सने सांगितल्याप्रमाणे, प्रवासी त्यांना सेल्फी घेण्याच्या कारणाने त्रास देत असतं. अनेकदा याची तक्रार करूनही कोणती कारवाई करण्यात आली नाही.

विमान प्रवासाप्रमाणे सुखसोयी तेजस एक्सप्रेसमध्ये देण्याकरिता महिला अटेंडेट म्हणजे महिला कर्मचारी ठेवण्यात आल्या आहे. जवळपास 45 महिला कर्मचारी तेजस एक्सप्रेसमध्ये कार्यरत आहेत. अनेकदा सेल्फी काढण्याच्या हेतूने महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार समोर यायचे.

Leave a Comment