कॅन्सरग्रस्तांसाठी 21 देशांचा विमान प्रवास करत जमवला फंड

आज कॅन्सरविषयी समाजात जागृकता पसरवणे गरजेचे झाले आहे. माहिती नसल्यामुळे अनेकदा उपचार घेण्यास देखील विलंब होता. अशातच एका व्यक्तीने कॅन्सरविषयी जागृकता पसरवण्यासाठी विमानाने 21 देशांचा प्रवास करण्याची कामगिरी केली आहे.

रवी कुमार बंसल यांनी जागृकता आणि कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी फंड जमा करण्यासाठी 46 दिवसात 21 देशांचा विमानाने प्रवास करण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारे ते देशातील पहिले सोलो ट्रॅव्हलर आहेत. फंड जमा करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि प्रवास याविषयी माहिती त्यांनी आपल्या ‘क्लियर्ड डायरेक्ट डेस्टिनेशन’या पुस्तकात दिली आहे.

रवि कुमार यांनी सांगितले की, अंबाला हे त्यांचे होमटाउन आहे. येथील रोटरी कल्बशी ते जोडलेले आहेत. 2012 मध्ये त्यांच्या वहिनींचे ब्रेस्ट कॅन्सरमुळे निधन झाले. माहिती नसल्याने वेळेत उपचार घेता आले नाहीत. त्यामुळे मनात होते की, जागृकता पसरवण्यासाठी आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी काहीतरी केले पाहिजे.

त्यांनी पुढे सांगितले की, एकीकडे कॅन्सरविषयी जागृकता करायची होती, तर प्लेन उडवण्याची देखील आवड होती. या सर्वातूनच विमानानेच प्रवास करत जागृकता आणि फंड जमा करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली.

रवि कुमार यांनी सांगितले की, 4 जुलै 2017 ला त्यांनी न्युयॉर्कमधील बफलो येथून प्रवासाला सुरूवात केली. तेथून त्यांनी कॅनडा, ग्रीनलँड, आयलँड, स्कॉटलँड, इटलीवरून भारत, बँकॉक, जापान अशा 21 देशांचा प्रवास केला. 46 दिवसांमध्ये 37000 किमीचा प्रवास करत त्यांनी दीड कोटी रुपये जमा झाले. या रक्कमेतून 2018 मध्ये एमआरआय मशीन रोटरी अंबाला कॅन्सर अँन्ड जनरल हॉस्पिटलला दिली.

त्यांच्या या प्रवासात अनेक अडचणी आल्या. 3 वेळा विमान खराब झाले. या प्रवासात 75 लाख रुपये खर्च आला. 2020 च्या एडिशनमध्ये गिनीज बुकमध्ये त्यांच्या नावाची नोंद होणार आहे.

या प्रवासानंतरच त्यांनी पुस्तक लिहिण्यास सुरूवात केली. अंबाला हॉस्पिटलमध्ये जो कोणी रक्कम डोनेट करतो, त्यांना त्यांचे पुस्तक भेट म्हणून दिले जाईल. 2015 मध्ये त्यांनी त्यांची वहिनी स्नेह यांच्या नावावरून स्नेह स्पर्श नावाचे अभियान सुरू केले. यामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांची मदत केली जाते.

Leave a Comment