डिप्रेशन करिता दिली जाणारी औषधे ठरू शकतात घातक


डिप्रेशन किंवा मानसिक तणाव कमी करण्यासाठी सर्वसाधारणपणे दिली जाणारी औषधे प्राणघातक ठरू शकतात असा दावा वैज्ञानिक करत आहेत. या औषधांच्या सतत वापरामुळे शरीरातील इंद्रिये निकामी होण्याचा धोका उद्भवू शकतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने अनेक केसेस चा अभ्यास केला असता हे निदर्शनास आले, की अँटी डीप्रेसंट औषधे वापरणाऱ्या रुग्णांमध्ये इंद्रिये निकामी होऊन मृत्यू येण्याचा धोका, इतर सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा सुमारे ३३ टक्के इतका जास्त आहे. तसेच ही औषधे वापरणाऱ्या रुग्णांना हृदयविकारासंबंधी तक्रारी निर्माण होण्याचा ही संभव असतो असे ही वैज्ञानिक म्हणतात. या संबंधीचे शोध आणि निदाने जर्नल ऑफ सायकोथेरपी अँड सायकोसोमॅटिक्स मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

हे निष्कर्ष चिंताजनक असून, डिप्रेशन कमी करण्यासाठी औषधांचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी, त्या औषधांचा आपल्या शरीरावर नेमका कसा परिणाम होईल हे जाणून घेणे अगत्याचे ठरत आहे, असे कॅनडा येथील ओंटारियोच्या मॅकमास्टर विद्यापीठाचे प्रोफेसर पॉल अँड्र्यूज म्हणतात. मेंदूद्वारे निर्माण केले जाणारे सेरोटोनीन हे एक असे तत्व आहे, ज्यावर एखाद्या व्यक्तीची चांगली किंवा वाईट मनस्थिती अवलंबून असते. तसेच आपल्या शरीरातील सर्व महत्वाची इंद्रिये, उदाहरणार्थ आपले हृदय, किडनी, फुफ्फुसे, लिव्हर या सर्वांनाच सक्रीय राहण्यासाठी सेरोटोनीनची आवश्यकता असते. डिप्रेशन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे आपल्या शरीरातील न्युरॉन्स सेरोटोनीन शोषून घेऊ शकत नाहीत. परिणामस्वरूप शरीरामधील इंद्रियांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डिप्रेशन टाळण्यासाठी औषधे वापरणाऱ्या व्यक्तींना त्या औषधांच्या दुष्परिणामांबद्दल पूर्वकल्पना देणे गरजेचे झाले आहे असे वैज्ञानिक म्हणतात.

जॅकलिन फर्नांडीसचा हॉट वर्कआउट व्हिडीओ झाला व्हायरल

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment