… म्हणून रशियात गायींना घातले जात आहेत व्हीआर गॉगल्स

सध्या टेक्नोलॉजीचा वापर प्रत्येक जागेवर होत आहे. रशियामध्ये देखील टेक्नोलॉजीचा वापर अशाच खास गोष्टीसाठी करण्यात आला. रशियामध्ये गायींच्या दुधाची मात्रा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी चक्क त्यांना व्हर्च्युअल रियालिटी गॉगल्स घालण्यात आले.

गायी चिंता मुक्त व्हाव्यात यासाठी खास त्यांना हे गॉगल घालण्यात आले. हे व्हीआर गॉगल्स गायींच्या कपळावर व्यवस्थित बसण्यासाठी खास तयार करण्यात आले आहेत.

रशियाच्या खाद्य आणि कृषि मंत्रालयाने सांगितले की, गायींच्या भावना आणि त्यांचे दुध उत्पादन यांच्यामध्ये एक नाते असते. व्हीआर लावून करण्यात आलेल्या चाचणीमध्ये दिसून आले की, गायींच्या भावनांमध्ये सुधारणा होत आहे.

गायींवरील हा प्रयोग मॉस्कोच्या रॅमेन्सकी जिल्ह्यातील रशमोलोको फार्म येथे करण्यात आला. त्यांनी सांगितले की, विविध देशातील डेअरी फार्मध्ये दिसून येते की, शांत वातावरणामुळे गायींच्या दुधाची गुणवत्ता आणि उत्पादन देखील सुधारते.

हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता संशोधक अधिक काळासाठी हा प्रयोग राबविण्याचा विचार करत आहे.

Leave a Comment