‘वर्षा’वर स्थलांतरित होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई – गुरुवारी शिवतीर्थीवर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. आता ते लवकरच आपले वांद्रे येथील निवासस्थान मातोश्री वरुन मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षामध्ये स्थलांतरित होणार आहेत. पण यासाठी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. पण ते वर्षा बंगल्यावर निश्चितपणे जाणार असल्याचे सांगितले जाते. वर्षा निवासस्थानी एक कार्यालय आणि एक कॉन्फरन्स रुम असून ते तेथून मुख्यमंत्रिपदाचे कामकाज करु शकतील.

दुसरीकडे सरकारी बंगला रिकामा करण्यास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे. मुव्हर्स आणि पॅकर्सची वाहने वर्षा बंगल्यासमोर थांबलेली दिसली. शुक्रवारी दुपारी औपचारिकरित्या उद्धव ठाकरे यांनी आपला कार्यभार स्वीकारला. याचदरम्यान, दक्षिण मुंबई येथील राज्य सचिवालयात मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची नेमप्लेट लावण्यात आली. शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी आपली पहिली कॅबिनेट बैठक घेतली.

Leave a Comment