नो-बॉल सुटू नये यासाठी बीसीसीआय शोधत आहे नवीन टेक्निक

आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये अंपायर्सच्या नजरेतून पायाचा नो बॉल सुटू नये यासाठी तंत्रज्ञानाची मदत मिळावी, असा प्रयत्न बीसीसीआय करत आहे. हा प्रयोग भारत आणि बांगलादेश यांच्यामधील कसोटी सामन्या दरम्यान करण्यात आला होता. बीसीसीआय रन आउट कॅमेऱ्याचा वापर नो बॉल पकडण्यासाठी देखील करत आहे, जेणेकरून अंपायर गोलंदाजांची चूक पकडू शकतील.

आयपीएलच्या मागील सीझनमध्ये नो बॉलवरून बराच राडा झाला होता. अनेक मॅचमध्ये नो बॉल असताना देखील अंपायर्सनी नो बॉल दिले नव्हते. केवळ आयपीएलच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमधील ब्रिस्बन येथे पार पडलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी तब्बल 21 नो बॉल अंपायर्सच्या लक्षात आले नाहीत.

बीसीसीआयचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी सांगितले की, नवीन पद्धतीचा वापर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यावर काम सुरू आहे.  वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मालिकेत देखील याचा वापर केला जाईल.

तिसऱ्या अंपायरद्वारा जे कॅमेरे रन आउट तपासण्यासाठी वापरले जातात. तेच कॅमेरे नो बॉल तपासण्यासाठी कामाला येतील. हे कॅमेरे एक सेंकदात 300 फ्रेम कैद करतात. या कॅमेऱ्यांचा ऑपरेटर इच्छेनुसार झूम करू शकतात. हा प्रस्ताव आयपीएलच्या गर्व्हनिंग काउंसिलमध्ये देखील ठेवण्यात आला होता. याशिवाय नो बॉल देण्यासाठी अतिरिक्त अंपायर ठेवण्याबाबत देखील विचार सुरू आहे.

Leave a Comment