या ठिकाणी सर्व्ह केले जातात किडे असलेले स्प्रिंग रोल आणि चिझकेक

जगभरातील हॉटेलमध्ये अनेक हटके पदार्थ बनवले जातात. अशाच एका कंबोडियाच्या रेस्टोरेंटमध्ये चक्क मुंग्या, झुरळ, नाकतोड्यापासून बनवलेले पदार्थ आणि किड्यांचा बर्गर ग्राहकांना सर्व्ह केला जातो. विशेष म्हणजे ग्राहक आवडीने याचा आस्वाद घेतात. या रेस्टोरेंटमध्ये अँन्ट स्प्रिंग रोल, सिल्कवॉर्म टारो क्रोक्यूटेस आणि बग मॅक देखील मिळते.

(Source)

कंबोडियाच्या सीइम रिअप या शहरात ‘बग्स कॅफे’ आहे. याठिकाणी शेफ सेईहा सोइन अगदी मजेशीररित्या नाकतोडा, कोळी, विंचू आणि झुरळ अशा विविध किंड्याचे पदार्थ तयार करतात. पर्यटकांचे देखील हे आकर्षणाचे ठिकाण झाले आहे.

शेफ सेईहा म्हणाले की, आमच्याकडे वेगळ्या प्रकारचे मेन्यू आहेत. त्यांनी सांगितले की, बग मॅक (बर्गर) बनवण्याची प्रॅक्टिस करत आहेत ज्यात मुंगी, मधमाशी, अळी आणि झुरळ असेल व वरती चीझची स्लाइस असेल.

(Source)

या रेस्टोरेंटचे सहसंस्थापक Davy Blouzard म्हणाले की, आम्हाला दाखवायचे आहे की कीटकांचा वापर करून देखील जवदार जेवण बनवता येते. या ठिकाणी डिझर्टसाठी स्वीट पोटेटो क्रीमसोबत मधमाशी, अळीबरोबर आंबा आणि झुरळ चिझकेक दिले जाते.

यूएनच्या खाद्य आणि कृषि संस्थेनुसार, जगभरातील 2 बिलियन लोक हे कीटक खातात. या रेस्टोरेंटमधील कर्मचारी खास “I HATE INSECTS” असे लिहिलेले टीशर्ट घालतात. यातील H अक्षरावर क्रॉस केलेले असते. अनेक ग्राहक या हॉटेलचा खास मेन्यू बघून या ठिकाणी आकर्षित होतात.

Leave a Comment