अगदी कमी खर्चात फिरू शकता हे 8 देश

जेव्हाही फिरायला जाण्याचा विचार येतो, तेव्हा सर्वात पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे खर्च किती येईल ? अनेक जणांना कमी पैशात चांगली परदेश ट्रिप करायची असते. मात्र अनेकांना वाटते की, कमी पैशात परदेशात फिरायला जाणे शक्य नाही. तर असे नाहीये, तुम्ही कमी पैशांमध्ये देखील परदेशात फिरायला जावू शकता.

जाणून घेऊया की किती खर्चामध्ये तुम्ही भारताच्या बाहेर फिरायला जावू शकता –

(Source)

व्हिएतनाम –

व्हिएतनाम हे एक चांगले ठिकाण आहे. जेथे तुम्ही बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. व्हिएतनाममध्ये प्रती दिन हॉटेलमध्ये राहण्यासाठी 1000 रुपये द्यावे लागतील. तर खाण्या-पिण्यासाठी जवळपास 800 रुपये खर्च येऊ शकतो. या हिशोबाने तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता.

(Source)

नेपाळ –

भारतीयांना नेपाळमध्ये जाण्यासाठी काहीही अडचणींचा सामना करावा लागत नाही. नेपाळमध्ये कोठेही थांबण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 हजार रुपये प्रतीदिन खर्च येईल. तर जेवणासाठी 500 रुपये खर्च येईल.

(Source)

भूतान –

जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात एकदा खास ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही भूटानला जाऊ शकता. येथे राहण्यासाठी दिवसाला 1000 ते 1500 रुपये खर्च येईल व जेवणासाठी 100 ते 400 रुपये खर्च येतो.

(Source)

श्रीलंका –

श्रीलंकाची ट्रीप तुम्ही अगदी स्वस्तात करू शकता. श्रीलंकेत हॉटेलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 700 ते 1000 रुपये खर्च येईल. जेवणासाठी तुम्हाला 300 ते 1200 रुपये मोजावे लागतील.

(Source)

थायलंड –

थायलंड फिरण्याचे मन असेल तर तुम्हाला तेथे दिवसाला राहण्यासाठी 1200 रुपये आणि जेवणासाठी 200 रुपये लागतील.

(Source)

सिंगापूर –

इतर देशांच्या तुलनेत सिंगापूर थोडे महागडे आहे. येथे एकदिवसाच्या हॉटेलचा खर्च 1700 रुपये आहे व जेवणासाठी जवळपास 500 रुपये खर्च करावे लागतील.

(Source)

मलेशिया –

तुम्ही कमी बजेटमध्ये मलेशियाला जाऊ शकता. येथे एका दिवसासाठी हॉटेलचा खर्च 600 रुपये आणि खाण्या-पिण्यासाठी 300 रुपये लागतात.

(Source)

मालदीव –

मालदीव सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. दरदिवसाच्या हिशोबाने हॉटेलचे भाडे 1500 रुपये आणि खाण्यासाठी 60 ते 120 रुपये खर्च येईल.

Leave a Comment