अर्थमंत्र्यांच्या भाषणा दरम्यान वामकुक्षी घेणाऱ्या खासदारांची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी राज्यसभेत विकास दरावर आपले मत मांडले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, विकास दर कमी तर झाला आहे, मात्र याचा अर्थ असा नाही की मंदी आहे.

निर्मला सीतारमण यांचे हे भाषण राज्यसभेतील खासदारांना काहीही आवडलेले दिसत नाही.  कारण त्या भाषण देत असताना त्यांच्या मागे बसलेले खासदार निंवात डुलकी घेत होते. केंद्रीय कौशल विकास मंत्री महेंद्र नाथ पांडे निंवात राज्यसभेत झोपले होते. अखेर कोणीतरी येऊन मागून त्यांना उठवते. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकरू देखील मधेच डुलकी घेताना दिसत होते.

निर्मला सीतारमण भाषण देत असताना खासदार झोपलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर करण्यास सुरूवात केली.

एका युजरने लिहिले की, मॅडम निर्मला सीतारमण संसदेमध्ये तुमचे खासदार झोपेत आहे… एवढेच चांगले तुमचे भाषण होते… विकास दर कमी मात्र मंदी नाही.

तर एका अन्य युजरने लिहिले की, विकास दरच झोपेत आहे.