भाजपला रामराम ठोकणार नाथाभाऊ ?


मुंबई: गेल्या पाच वर्षांचा हिशोब आता पूर्ण करणार अशा प्रकारची टीका एकनाथ खडसे यांनी केली असतानाच आता पक्षात राहूनच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांवर खडसे वार करत राहणार की टोकाची भूमिका घेत पक्षालाच सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. पण इतर अनेक मंत्र्यांना आरोप झाल्या झाल्या क्लीन चिट देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना परत कधीच मंत्री होऊ दिले नाही. त्यातच त्यांचे तिकीटही निवडणुकीत कापले. खडसे यांच्या राजकीय कारकीर्दीसमोरच प्रश्नचिन्ह लावणाऱ्या फडणवीस यांचा राजकीय हिशोब चुकता करण्यास आता खडसे कोणतीही कुचराई करणार नाहीत, अशी चर्चा खडसे समर्थकांमध्ये सुरु आहे. पण ते पक्षात राहूनच हा हिशोब चुकता करणार की पक्षाला सोडचिठ्ठी देऊन करणार याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Leave a Comment