
मुंबई – आज मुख्यमंत्रिपदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान होणार आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. आता संजय राऊत यांची सामनाच्या संपादकपदी वर्णी लागली आहे. ते सध्या सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.
शपथविधी आधीच उद्धव ठाकरेंनी सोडले ‘सामना’चे संपादक पद
वर्तमानपत्राच्या संपादकपदी शासकीय पदावर असताना राहता येत नसल्यामुळेच संपादकपदाचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे. सध्या कार्यकारी संपादकपदी असलेले संजय राऊत यांची मुख्य संपादकपदी निवड झाली आहे. दरम्यान, शिवसेनेची भूमिका सामनामधून स्पष्ट केली जाते. संजय राऊत यांनी निवडणुकांच्या काळात सामनातून लिहिलेले अग्रलेख, रोज होणाऱ्या पत्रकार परिषदा, सोशल मीडियावरून त्यांनी कायमच शिवसेनेची बाजू परखडपणे लावून धरली. त्यामुळेच सामनाच्या संपादक पदी त्यांची निवड झाली आहे.
