रोगमुक्त राहण्यासाठी आपल्या रक्तगताप्रमाणे निवडा भाज्या आणि फळे


आपल्या सर्वांचाच एक निश्चित असा रक्तगट असतो. आपला रक्तगट आणि आपले आरोग्य परस्परावलंबी आहेत असे वैद्यानिकांचे म्हणणे आहे. तसेच आपला स्वभावही आपल्या रक्तगटाशी निगडीत असल्याचेही म्हटले जाते. शरीरस्वास्थ्याचा विचार करता, काही ठराविक रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना ठराविक आजार होण्याची संभावना, इतर रक्तगट असलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त असू शकते. उदाहरणार्थ ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना पोटाचे विकार होण्याची शक्यता असते, पण त्यांना हृदयविकाराशी संबंधित त्रास कमी संभवतात. तसेच अ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना व्हायरल, बॅक्टेरीयल व फंगल इन्फेक्शन्स होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपला रक्तगट विचारात घेऊन त्याप्रमाणे आपल्या आहारात थोडेफार बदल केल्यास पुढे उद्भविणारे विकार टाळले जाऊ शकतात.

अ रक्तगट असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. या व्यक्तींनी गाजर, पीच, नाशपाती, हिरव्या पालेभाज्या, लसूण, ब्रोकोली, अंजीरे, आणि अवोकाडो या अन्नपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. तसेच दुधापासून बनलेले पदार्थ, भात यांचे सेवन माफक प्रमाणात करावयास हवे.

बी रक्तगट असणाऱ्यांनी अननस, केळी, द्राक्ष आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावयास हवे. भाज्यांमध्ये ब्रोकोली, मोडवलेली कडधान्ये, गाजरे, मशरूम्स, रताळी आणि सुरण यांचा समावेश असावा. हा रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यास साधारण सर्वच भाज्या आणि फळे हितकारी आहेत.

ए बी रक्तगट असणाऱ्या व्यक्ती तशा कमीच आढळतात. साधारणपणे शंभर व्यक्तींमध्ये पाचच व्यक्तींचा रक्तगट ए बी असण्याची शक्यता असते, इतका हा रक्तगट दुर्मिळ आहे. हा रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात बीट, ओवा, फ्लॉवर, काकड्या, वांगी, लसूण, रताळी यांचा समावेश करावा.

ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये अधिक प्रथिने असलेले अन्नपदार्थ समाविष्ट करावेत. उदाहरणार्थ डाळी, मासे, दुध आणि दुधासून तयार केलेले पदार्थ विशेष करून सेवन करावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment