या पोलीस स्टेशनला एकदा नक्की भेट द्या, असे का म्हणत आहेत नेटकरी ?

इंटरनेटच्या जगात काहीही होऊ शकते. कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल, तर कधी कोणती गोष्ट विनाकारण चर्चेचा विषय ठरेल हे सांगता येत नाही. असेच तामिळनाडूमधील एक पोलीस स्टेशन इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. लोक या स्टेशनला दर्शनीय स्थळांच्या यादीत समावेश करत आहेत. नेटकरी गुगलवर या पोलीस स्टेशनला फाइव्ह स्टार रेटिंग देत आहेत. लोक असे का करत आहेत हे कोणालाच माहिती नाही. एकाने असेच मस्करीमध्ये रिव्ह्यू दिला. त्यानंतर रिव्ह्यूची रांगच लागली.

तामिळनाडूच्या चेन्नई-तिरूवल्लूर रोडवर Thirumullaivoyal T10 नावाचे पोलीस स्टेशन आहे. गुगलवर या स्टेशनचे रिव्ह्यूज चर्चेत आले आहेत. दोन वर्षांपुर्वी पद्मनाभन रूद्रा नावाच्या युजरने या स्टेशनला गुगल रिव्ह्यूमध्ये 3 स्टार दिले होते.

(Source)

बुधवारी एका लोगेश्वरन एस नावाच्या युजरने पोलीस स्टेशनला 4 स्टार देत लिहिले की, मला या स्टेशनमध्ये गाडीची कागदपत्रे नव्हती म्हणून बंद करण्यात आले. स्टेशन साफ आहे व मुख्य रस्त्यावरच आहे. कर्मचारी देखील चांगले आहेत व त्यांना मला कसलाही त्रास दिला नाही. कोणतीही लाच न घेता त्यांनी माझी माहिती आणि फिंगरप्रिंट घेऊन मला सोडून दिले. तुम्ही आयुष्यात एकदा तरी येथे जायला हवे.

(Source)

या युजरचे रिव्ह्यूनंतर एकामागोमाग रिव्ह्यूची लाइनच लागली. अनेक नेटकऱ्यांनी यावर अफलातून असे रिव्ह्यू देण्यास सुरूवात केली. लोगेश्वरननंतर मनू विपिन नावाच्या युजरने स्टेशनला 4 स्टार देत लिहिले की, एक स्टार कमी देत आहे. कारण, लोगेशला या स्टेशनमध्ये बंद करण्यात आले होते. तो अर्ध्या रात्री कागदपत्र नसताना गाडी चालवत होता.

(Source)

एकामोगामाग अनेक युजरनी या स्टेशनला रिव्ह्यू देत या स्टेशनला एकदा तरी नक्की भेट द्या असे लिहिले. काही युजरनी तर स्टेशनमध्ये वाय-फायची सुविधा नसल्याचे देखील म्हटले.

आतापर्यंत 53 युजर्सनी या पोलीस स्टेशनला गुगलवर रिव्ह्यू दिले आहेत. स्टेशनला सरासरी 5 पैकी 4.2 स्टार मिळाले आहेत. तुम्ही देखील हे रिव्ह्यू वाचून नक्की हसाल.

Leave a Comment