समुद्राचे पाणी पिण्याजोगे बनविण्यासाठी या ठिकाणी लावला जगातील पहिला सोलर पॉवर प्लांट

केनियाची बिगर सरकारी संस्था गिव्ह पॉवरने जगातील पहिले असे सोलर वॉटर प्लांट तयार केले आहे, जे समुद्री पाण्याला पिण्यायोग्य बनवेल. हा प्लांट पापुआ न्यू गिनीच्या किउंगा शहरात स्थापित करण्यात आला आहे. दावा करण्यात येत आहे की, येथून प्रत्येक दिवशी 35 हजार लोकांना पिण्यायोग्य पाणी मिळू शकेल.

सोमालियाच्या सीमेलगत असलेल्या हिंद महासागराच्या तटावर मच्छिमारांचे एक गाव आहे. या ठिकाणी जवळपास 3500 लोक राहतात. येथे विजेबरोबरच पिण्याच्या पाण्याची देखील समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी संस्थेने हा प्लांट लावला आहे.

डब्ल्यूएचओनुसार, जगभरातील 84.40 कोटी जनतेला पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. यातील 3 लाख लहान मुले असे आहेत, ज्यांचा दरवर्षी दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्यू होतो. सध्या जवळपास 200 कोटी लोक पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात राहत आहेत.

 

 

Leave a Comment