व्हॉट्सअ‍ॅपद्वारे हेरगिरी झाल्याची सरकारची राज्यसभेत कबुली

व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरी प्रकरणाबद्दल केंद्रीय दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत कबुली दिली आहे. भारतातील 121 जणांच्या फोनला निशाणा बनविण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, 5 सप्टेंबर 2019 ला व्हॉट्सअ‍ॅपने सीआरटीला पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती. मात्र हॅकर्सपर्यंत कोणती माहिती पोहचली याबाबतची माहिती मिळाली नाही.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, डिजिटल कंपन्यांचे भारत आणि परदेशातही डिजिटल बाजारात योगदान देण्यासाठी स्वागत आहे. त्यांना समजायला हवे की, भारतीयांची रक्षा आणि सुरक्षा हे महत्त्वाचे आहे. त्यांनी हे सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.

या प्रकरणावर दिग्विजय सिंह म्हणाले की, मी सर्व पक्षांना एक संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची आणि संवेदनशील मुद्यांची तपासणी करण्याची मागणी करतो. कारण हे आपल्या मूलभूत अधिकार आणि राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेले आहे.

मागील आठवड्यातच फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुपने पेगासस स्पायवेअरद्वारे 121 भारतीयांना निशाणा बनवल्याची माहिती सरकारला दिली होती. यातील 20 जणांचा डेटा चोरी झाला आहे. मात्र जो डेटा चोरीला गेला आहे. त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment