रेल्वे प्रवाशांना क्यूआर कोडद्वारे कळणार कोणत्या किचनमध्ये तयार झाले आहे मांसाहारी जेवण

रेल्वे प्रवाशांची नेहमी तक्रार असते की, त्यांनी जेवणासाठी ऑर्डर वेगळी दिलेली असते आणि त्यांना आलेले पदार्थ हे वेगळेच दिलेले असतात. आता या समस्येतून सुटका करण्यासाठी रेल्वे क्यूआर कोड असलेले पदार्थ देणार आहे. हे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ते पदार्थ अथवा जेवण कोणत्या प्रकारचे आहे याची माहिती मिळेल. याशिवाय जेवण कोणत्या किचनमध्ये बनले आहे याची माहिती देखील व्हिडीओद्वारे घेऊ शकाल.

व्हिडीओच्या माध्यमातून माहिती मिळेल की, शाकाहारी किचनमध्येच शाकाहारी जेवण बनविण्यात आले आहे. तर मांसाहारी किचमध्ये मांसाहारी जेवण बनविण्यात आलेले आहे. सध्या राजधानी, शताब्दी एक्सप्रेसमध्ये क्यूआर कोड असलेले जेवण दिले जात आहे. लवकरच अन्य रेल्वेंमध्ये देखील ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

रेल्वे अधिकारी जीएम सिंह यांनी सांगितले की, नवी दिल्ली स्टेशनच्या बेस किचनमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रत्येक जेवणावर क्यूआर कोड लावण्यात आलेला आहे. आधुनिक मशिन्सद्वारे पॅकिंग केल्यानंतर त्यावर क्यूआर कोड लावला जातो. प्रवाशांना शुद्ध वैष्णव आणि जैन जेवणांना वेगळे पॅकिंग केले जाते. एवढेच नाही तर हे सर्व जेवण वेगवेगळ्या किचनमध्ये तयार केले जाते.

Leave a Comment