इम्रानने ‘झाडे रात्री ऑक्सिजन सोडतात’, म्हणून करुन घेतली फजिती - Majha Paper

इम्रानने ‘झाडे रात्री ऑक्सिजन सोडतात’, म्हणून करुन घेतली फजिती

पाकिस्तानातील मंत्री आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या विचित्र विधानांपुढे विज्ञान देखील लाजेल अशी वक्तव्य पाकच्या मंत्र्यांनी दिली आहेत. मात्र आता या पंक्तीत स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्थान मिळवले आहे. इम्रान खान यांनी ग्लोबल वॉर्मिंगवर विचित्र वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांची खिल्ली उडवली जात आहे. इम्रान खान यांनी झाडे रात्रीच्या वेळी ऑक्सिजन सोडतात असे म्हटले आहे.

ट्विटरवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इम्रान खान म्हणत आहेत की, पाकिस्तानचा 70 टक्के भागात हिरवळ होती, मात्र मागील 10 वर्षात ती कमी झाली आहे. याचेच हे परिणाम आहेत. कारण झाडे हवेला साफ करतात. ते रात्री ऑक्सिजन देतात. कार्बनडायोक्साइड शोषून घेतात.

तिसरीच्या वर्गातच शिकवले जाते की, झाडे दिवसा ऑक्सिजन उत्सर्जित करतात. तर रात्रीच्या वेळी झाडे वातावरणात कार्बन डायोक्साइड सोडतात. मात्र इम्रान खान यांनी विज्ञान चुकीचे शिकले का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

https://twitter.com/bsumit007/status/1199883761099259904

या वक्तव्यानंतर इम्रान खान सोशल मीडियावर ट्रोल होत असून, युजर्स त्यांच्या ऑक्सफर्ड डिग्रीवर देखील प्रश्न उपस्थित करत आहेत.

Leave a Comment