नॉट रिचेबल झालेले अजितदादा झाले रिचेबल


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आज होणाऱ्या शपथविधीच्या आधीच नॉट रिचेबल झालेले अजित पवार पुन्हा संपर्कात आले आहेत. फोनवरुन सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता अजित पवार सिल्व्हर ओकवर येणार आहेत. तिकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे, यासाठी दबाव वाढत असल्यामुळे अजित पवारच उपमुख्यमंत्री होतील, पण याबाबतचा निर्णय आज दुपारी २ वाजता किंवा नंतर घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. दरम्यान याबाबत अजित पवार बनणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक त्यांच्या घरी आणि धनंजय मुंडे यांच्या घरी जमले आहेत. धनंजय मुंडे यांच्या घरी अजित पवार येणार असल्याची चर्चा असल्याने तिथेही समर्थकांची गर्दी केली होती.

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाजपला पाठिंबा देऊन खळबळ माजवून दिली. अजित पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजित पवारांचे हे बंड ३ दिवसांमध्येच थंड झाले आणि अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Leave a Comment