मुलाला शेतकरी बनविण्यासाठी आईने लाथाडली 90 हजारांची नोकरी

आज गावं ओसाड पडत चालली असून, सर्वजण शहरात राहिला येत आहेत. शेतीच्या परिस्थिती वाईट असल्याने कोणी शेती देखील करत नाही. कोणतेही आई-वडिल आपल्या मुलाला शेतकरी हो असे सांगत नाही. मात्र या सर्व गोष्टीत एका जोडप्याने आपल्या मुलाला शेतकरी बनवण्यासाठी शहर सोडले आहे.

द बेटर इंडियानुसार, राजेंद्र सिंह आणि त्यांच्या पत्नी चंचल या राजस्थानच्या अजमेर येथील आहेत. दोघांना 11 वर्षांचा मुलगा असून, त्याचे नाव गुरूबक्ष सिंह आहे. 54 वर्षीय राजेंद्र हे रेल्वेत कामाला आहे. तर त्यांची पत्नी सरकारी स्टाफ नर्सचे काम करायच्या. दोघांनी मिळून इंदौरजवळ दीड एकर जमीन खरेदी केली असून, तेथे ते आपल्या मुलाला शेतीची ट्रेनिंग देतात.

या जोडप्याचे म्हणणे आहे की, भले ही आपण एखाद्या मोठ्या शहरात राहून चांगले पैसे कमवत असू, मात्र आपण स्वच्छ हवा आणि पाण्यासाठी तरसतो. एवढेच नाही तर आजकाल घरात सुर्यप्रकाश देखील येत नाही. अशा परिस्थितीमध्ये पैसे कमवून काय करायचे. जोडप्याने याच कारणामुळे आपल्या मुलाला शेतकरी बनविण्याचे ठरवले.

गुरूबक्षच्या आईने 2016 मध्ये प्रती महिना 90 हजारांची नोकरी सोडली. 2017 ला ते इंदौरला राहिला आले. जेथे त्यांनी पद्मश्री डॉ. जनक पलटा यांच्याकडून शेतीचे प्रशिक्षण घेतले. सोबतच सोलर कुकिंग, सोलर ड्राईंग आणि झिरो-वेस्ट लाइफस्टायल जगण्याची कला देखील शिकली. त्यांचा मुलाला देखील हे काम आवडत आहे. गुरूबक्ष आपल्या आईची मदत करत असतो. गावात त्याचे अनेक मित्र झाले आहेत.

ते सांगतात की, आज लोक आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि राहण्या-खाण्यावर लाखो रूपये खर्च करतात. मात्र पैसे कमवण्याच्या नादात त्यांना वेळ देत नाहीत. आम्ही आमच्या मुलाला नेहमी सांगतो की, तू कोणत्याही रेसमध्ये नाहीस. त्याला कोणाच्याही पुढे किंवा मागे नाही चालायचे. त्याला केवळ आपल्या गतीने चालत राहायचे आहे.

हे जोडपे आता सौर उर्जेनेच जेवण बनवतात. घरातील भाज्या देखील शेतीतूनच येतात. चंचल स्वतः गुरूबक्षचे शिक्षण,  शेतीची ट्रेनिंग, फार्मचे काम या सर्व गोष्टी एकट्या सांभाळतात.