हा आहे विना विजेचा हीटर, थंडीत ऊबेसाठी केला जातो वापर

थंडीच्या काळात तुमच्यासोबत ठेवण्यासाठी एक हीटर दिले तर किती चांगले होईल ना. विचार करा, ते हीटर जर विना विजेचे चालणारे असेल तर ? त्यापेक्षा आणखी चांगले काय असेल. आपल्या देशात सर्वाधिक थंडी ही काश्मिरमध्ये पडते. मात्र या थंडीत मातीच्या भांड्यात निखारा असलेली कांगडी (एक प्रकारची छोटी शेगडी) ऊब देते.

(Source)

काश्मिरमध्ये जेव्हा हिवाळ्यात तापमान शून्य ते मायन्स 20 डिग्रीपर्यंत पोहचते, तेव्हा कांगडीचे लोकांचा आधार ठरते. कांगडी काश्मीरच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. याची बनावट केवळ देशातीलच नाही तर विदेशातील नागरिकांना देखील आकर्षित करते.

(Source)

कांगडी काश्मिरमधील पारंपारिक वस्तूंपैकी एक आहे. या इंग्रजीमध्या फायर पॉट असे म्हणतात. थंडीमध्ये कांगडी लोकांसाठी एकप्रकारेच चालते फिरते हीटरच आहे. बाहेरून येणारे पर्यटक याला पोर्टबल आणि मूविंग हीटर देखील म्हणतात.

(Source)

मातीच्या भांड्यात धगधगते निखाऱ्यांनी भरलेली कांगडी, बाहेरून हाताने तयार केलेल्या टोपलीसारखे असते. काश्मिरचे लोक त्याला फिरनच्या (एक कापड) आत ठेवतात.

(Source)

कांगडी हे पर्यावरणास देखील अनुकूल असून, यामध्ये काश्मिरच्या लोकांची कला दिसून येते.

Leave a Comment