लग्नासाठी आवश्यक कोर्समध्ये नापास झाल्यास या देशात नाही विवाहाचा अधिकार

सध्या इंडोनेशियामध्ये लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. याला कारणही तसे खास आहे. येथील सरकार प्री-वेडिंग कोर्स सुरू करणार आहे. यामध्ये लग्न करणाऱ्या जोडप्यांना लग्नानंतर आयुष्यात होणाऱ्या बदलांबद्दल शिक्षित केले जाईल. यामध्ये आरोग्याची काळजी, आजारापासून वाचणे आणि बाळांची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून, लग्नानंतर जोडपे सुखाने राहू शकतील. लग्नाचे वय झालेल्या सर्व युवकांना हा कोर्स अनिवार्य आहे. आश्चर्य म्हणजे या कोर्समध्ये नापास झाल्यास सरकार लग्नाचा अधिकार देणार नाही.

हा कोर्स 2020 मध्ये सुरू होणार असून, हा मोफत कोर्स असेल. तीन महिन्यांचा हा कोर्स इंडोनेशियाच्या मानव विकास आणि सांस्कृतिक मंत्रालयाने धार्मिक आणि आरोग्य विभागासोबत मिळून तयार केला आहे. आरोग्य विभागाचे डायरेक्टर जनरल किराना प्रितसरी यांनी सांगितले की, असा कोर्स घ्यायची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील विभागाने असे केले आहे. आता केवळ हा कोर्स देशभरात सुरू केला जाईल.

यामध्ये जोडप्यांना लग्नानंतर येणाऱ्या सर्व अडचणी, मुले या गोष्टींचे ट्रेनिंग दिले जाईल. या कोर्सचा उद्देश कोणतेही जोडपे वैवाहिक आयुष्य कसे सांभाळते आणि आई-वडिल बनण्यासाठी भावनिक व शारिरिक रूपाने तयार आहेत का हे पाहणे आहे.

इंडोनेशियाचे मानव विकासमंत्री मुहाजिर एफेंदी म्हणाले की, हा कोर्स अनिवार्य यासाठी आहे, जेणेकरून लोक लग्नानंतर जबाबदारीने राहतील. कोर्स पुर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेटद्वारे लग्नाची मंजूरी देण्यात येईल.

Leave a Comment