चक्क टाकाऊ बाटल्यांपासून तयार करण्यात आली ‘बॉटल बोट’

मध्य आफ्रिकेतील देश कॅमेरूनमधील इस्माइल इबोन नावाच्या युवकाने समुद्राच्या तटावरील प्लास्टिकच्या बाटल्या जमा करून बॉटल-बोट तयार केली आहे. या बोटीमध्ये तीन लोक बसून मासे पकडू शकतात. हे युवक बॉटल बोट बनवून मच्छिमारांना मोफत देत आहेत. इस्माइलने शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी स्वतःकडील सर्व पैसे विना नफा संस्था ‘मदिबा अँन्ड नेचर’ला दान केले आहेत.

इस्माइलने सांगितले की, बॉटल बोट बनवून आम्ही किब्री भागातील मासे पकडणाऱ्यांना मोफत देतो. एका बोटीसाठी 1 हजार बाटल्या लागतात. याचे वजन 270 किलोपर्यंत असते. ही बोट अन्य सामानांसोबत 3 लोकांना घेऊन जावू शकते. एक नाव बनविण्यासाठी एक आठवडा लागतो.

इस्माइलने सांगितले की, 2011 मध्ये विद्यार्थी असताना आलेल्या वादळात अनेक प्लास्टिकच्या बाटल्या अचानक समुद्री तटावर गोळा झाल्या होत्या. प्रशासनाने या बाटल्या काढल्या नाहीत तेव्हा त्यांनी या बाटल्या जमा केल्या व नाव तयार केली.

प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी त्याने आपले सर्व पैसे मदिबा अँन्ड नेचर ही संस्था सुरू करण्यासाठी लावले. ही संस्था प्लास्टिक कचरा जमा करते व त्यानंतर मच्छिमारांसाठी नाव तयार करते. इस्माइलच्या कामाने प्रभावित होऊन सरकारच्या कॅमेरून संघटनेने पहिले प्लास्टिक रिसायकलिंग प्लांट इकोबिन स्थापित केले आहे.

Leave a Comment